Current Affairs // Awards 2020–21

चालू घडामोडी २०२०-२०२१ By Dr. Ganesh Shinde

Career Orbit Academy
9 min readJan 2, 2022

1) महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2020

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2020

प्राथमिक माहिती

पुरस्कार घोषणा — 1995 ; पुरस्कार सुरुवात 1996 ; स्वरूप 10 लाख रुपये ;पुरस्कार परप्रांतीय व्यक्ती यांनाही दिला जातो ; परंतु त्या व्यक्ती महाराष्ट्रात पंधरा वर्षे वास्तव्य असावे.

महाराष्ट्र भूषण हा भारतातील महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरवर्षी दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युती सत्तेवर आल्यावर त्यांनी हा पुरस्कार देण्याचा प्रस्ताव ठेवला. महाराष्ट्र भूषण हा प्रथम 1996 मध्ये प्रदान करण्यात आला. सुरुवातीला साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रांत प्रत्येक वर्षी हा पुरस्कार दिला जात असे. नंतर सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जातो.

पुरस्कार जाहीर 25 मार्च 2021

हा पुरस्कार निवड समिती अध्यक्ष — मुख्यमंत्री ; 2020 चा पुरस्कार ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना जाहीर ; पुरस्कार क्रमांक 16 वा 18 वी व्यक्ती

आतापर्यंतचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार व्यक्ती

पु. ल. देशपांडे (1996), लता मंगेशकर (1997), विजय भटकर, सचिन तेंडुलकर, भीमसेन जोशी , अभय व राणी बंग, बाबा आमटे, रघुनाथ माशेलकर, रतन टाटा, आर. के. पाटील, नाना धर्माधिकारी, मंगेश पाडगावकर, सुलोचना लाटकर, जवंत नारळीकर, अनिल काकोडकर, बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले

2) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2020

  • प्राथमिक माहिती
  • सुरुवात — 1954
  • केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयद्वारे
  • वितरण राष्ट्रपतींद्वारे
  • पहिला पुरस्कार — श्यामची आई
  • 2020 चे पुरस्कार
  • 2020 चा पुरस्कार 67 व्या क्रमाकांचा.
  • निवड समिती अध्यक्ष एन. चंद्रा
  • घोषणा — 22 मार्च 2021
  • सर्वोत्कृष्ट सिनेमा (सुवर्णकमळ) — मारकर अरबिकादालिते सिम्हम (मल्याळम)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संजय पूरणसिंग चौहान (बहत्तर हूरे) -
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता — मनोज वाजपेयी / धनुष
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कंगणा राणावत -
  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट — बाडौ
  • सर्वोत्कृष्ट कोंकणी चित्रपट — काजरी
  • सर्वोत्कृष्ट बालचित्रपट — कस्तुरी
  • सुवर्णकमळ मिळालेले मराठी चित्रपट

1. श्यामची आई 1954 2. श्वास- 2003

3. देऊळ- 2011 4. कोर्ट 2014

5. कासव -2016

दादासाहेब फाळके पुरस्कार 2019

प्राथमिक माहिती :

  • सुरुवात 1969 (जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरुवात)
  • स्वरूप 10 लाख रुपये -
  • पहिला पुरस्कार — देविका राणी
  • दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टीचे जनक
  • मूळ नाव धोंडिराज गोविंद फाळके -
  • जन्म 30 एप्रिल 1870 (नाशिक) -
  • निधन 16 फेब्रुवारी 1944
  • पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र 1913

2020 -21

  • 51 व्या क्रमांकाचा 2019 चा पुरस्कार रजनीकांत यांना 1 एप्रिल 2021 रोजी जाहीर.
  • दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे 12 वे दाक्षिणत्व अभिनेते.
  • निवड समिती- आशा भोसले, सुभाष घई, मोहनलाल, शंकर महादेवन, विश्वजीत चटर्जी
  • रजनीकांत यांच्याविषयी
  • जन्म 12 डिसेंबर 1950
  • मूळ नाव- शिवाजीराव गायकवाड
  • दक्षिण भारतात देवाचा दर्जा
  • टॉलीवूडमध्ये विशेष स्थान.
  • त्यांना मिळालेले इतर पुरस्कार
  • पद्मविभूषण 2016 -
  • पद्मभूषण 2000
  • त्यांचा प्रवास बस कंडक्टर से अभिनेता असा आहे.

जनस्थान पुरस्कार 2021

प्राथमिक माहिती :

  • सुरुवात 1991
  • द्वारे कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक)
  • दर दोन वर्षांनी दिला जातो.
  • कुसुमाग्रज पूर्ण नाव विष्णु वामन शिरवाडकर (वि. वा. शिरवाडकर)
  • पहिला पुरस्कार विजय तेंडुलकर
  • स्वरूप — 1 लाख रुपये

2020–21

  • 2021 चा पुरस्कार मधू मंगेश कर्णिक यांना प्रदान.
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष होते. (2014–2019)
  • प्रथमच प्रतिष्ठानच्या माजी अध्यक्षाला पुरस्कार दिला गेला.
  • 16 व्या क्रमांकाचा पुरस्कार.
  • सदर पुरस्कार कुसुमाग्रजांच्या जयंतीला 27 फेब्रुवारीला प्रदान केला गेला. या पुरस्कारावर आधारित प्रश्न

साहित्य अकादमी पुरस्कार 2020

  • प्राथमिक माहिती
  • सुरुवात 1954
  • स्वरूप 1 लाख
  • दरवर्षी 24 माषेकरिता पुरस्कार दिला जातो. यात संविधानातील 22 भाषा आणि इंग्रजी व राजस्थानी वा दोन भाषांचा समावेश.
  • साहित्य अकादमीद्वारे दिला जातो.
  • साहित्य अकादमी स्थापना 12 मार्च 1954

2020–21

  • घोषणा: मार्च 2021
  • मुख्यालय नवी दिल्ली
  • निवड समिती : अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार
  • मंदा खरे यांच्या ‘पचा’ या कांदबरीला 2020 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
  • पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.
  • कांदबरीत मंदा खरे यांनी चंद्रपूर आणि गडचिरोलीतील नैसर्गिक सौदर्य आणि कोळसा उद्योग यावर भाष्य केले आहे.
  • मराठी कवयित्री अनुराधा पाटील यांना ‘कदाचित अजूनही’ या काव्यसंग्रहासाठी २०१९ साठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.

तानसेन सन्मान 2020

प्राथमिक माहिती

  • शास्त्रीय संगीत क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान.
  • द्वारा मध्यप्रदेश
  • स्वरूप दोन लाख.
  • ग्वाल्हेर येथे जन्मलेले संगीत सम्राट तानसेन ऊर्फ रामतनु बांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिला जातो.

2020–21

  • 2020 चा सन्मान सुंतस्वादक सतीश व्यास यांना प्रदान.
  • सतीश व्यास यांचे वडील दिवंगत पंडित सी. आर. व्यास यांनाही 1990 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • सतीश व्यास भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांचा प्रसार व्हावा यासाठी ते ‘गुणिदास संगीत संमेलन’ आयोजित करतात. गेली तीन दशके सतीश व्यास यांनी देशपरदेशातील अनेक संगीत महोत्सवांमध्ये वादन केले आहे. इटलीतील व्हेनिस येते आयोजित केलेल्या ‘मोस्ट्रा मोझार्ट फेस्टिवल’मध्ये त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

व्यास सन्मान 2020 (30 वा पुरस्कार)

प्राथमिक माहिती :

  • सुरुवात 1991
  • द्वारे के. के. बिर्ला फाऊंडेशन -
  • हिंदी भाषेतील उल्लेखनीय साहित्यकृतीबद्दल
  • मरणोत्तर दिला जात नाही.
  • स्वरूप — 4 लाख रुपये
  • पहिला पुरस्कार राम विलास शर्मा (भारत के प्राचीन भाषा, परिवार कांदबरी)

2020–21:

  • 2020 व्यास सन्मान
  • प्रा. शरद पंगारे (मूळचे मध्यप्रदेश)
  • पाटलीपुत्र की सामग्री कांदबरीसाठी.
  • निवड समिती अध्यक्ष रामजी तिवारी.

सरस्वती सन्मान 2020

प्राथमिक माहिती

  • सुरुवात — 1991
  • स्वरूप 15 लाख
  • द्वारे के. के. बिर्ला फाऊंडेशन (कृष्ण कुमार)
  • पहिला पुरस्कार हरिवंशराय बच्चन

2020–21

  • पुरस्कार जाहीर 30 मार्च 2021 -
  • निवड समिती अध्यक्ष डॉ. सुभाष कस्वप -
  • 2020 चा पुरस्कार प्राप्त शरणकुमार लिंबाळे
  • त्याच्या ‘सनातन’ या कांदबरीला. • या कांदत्वरीत स्वातंत्रलयात दलित आणि आदिवासींचे योगदान यावर लिखाण.

ज्ञानपीठ पुरस्कार

  • २०१९: मल्याळी भाषेतील प्रसिद्ध भारतीय कवी पद्मश्री अक्किथम अत्युथन नंबुथिरी यांची २०१९ या वर्षासाठीच्या साहित्यातील प्रतिष्ठेच्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली.
  • हा आजवरचा ५५ वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे.
  • नंबुथिरी हे भारतीय साहित्य विश्वात अक्किथम या नावाने परिचित आहेत. कवितेबरोबरच त्यांनी नाटक, बालसाहित्य, लघुकथा, चिकित्सा करणारे निबंध असे त्यांची ५५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांपैकी ४५ कवितासंग्रह आहेत.
  • काव्यात त्यांनी कथा काव्य, चरित काव्य, खंड काव्य आणि गाणी लिहिली आहेत. ‘निमिषाक्षेत्रम्’, ‘वीरवदम्’,’बळिदर्शनम्’, ‘अमृतखतिका’, ‘अक्किथम कवितका’, ‘अंतिमहाकालम्’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.
  • लेखनातून त्यांनी पारंपरिकता व आधुनिकता यांत सेतू बांधण्याचं काम केलं आहे. सामाजिक बदलात त्यांच्या लेखनाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार ज्ञानपीठ निवड मंडळाने काढले आहेत.

पुरस्काराविषयी

  • १८ फेब्रुवारी १९४४ रोजी प्रसिद्ध उद्योगपती स्वर्गीय साहू शांतिप्रसाद जैन यांनी अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या अधिवेशनानंतर भारतीय साहित्य आणि सांस्कृतिक कार्यासाठी वाराणसी भारतीय या संस्थेची स्थापना केली.
  • शांतिप्रसाद यांच्या पत्नी श्रीमती रमा जैन ह्या संस्थेच्या स्थापनेपासून १९७५ पर्यंत अध्यक्षा होत्या.
  • भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार १९६६ पासून दरवर्षी आधुनिक भारतीय भाषांतील एका सर्वोत्कृष्ट, मौलिक व सर्जनशील ग्रंथास दिला जातो. १९६६ मध्ये पहिला (१९६५ साठीचा) पुरस्कार मल्याळी लेखक जी. शंकर कुरूप यांना दिला गेला.

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक

  • आजवर मराठी भाषेतील चार साहित्यिकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
  1. पहिल्यांदा १९७४ साली वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ कादंबरीला,
  2. १९८७ मध्ये वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ या नाटकास,
  3. २००३ साली विंदा करंदीकर यांच्या ‘अष्टदर्शने’ या काव्य संग्रहाला,
  4. २०१४ साली ‘हिंदू- जगण्याची एक समृद्ध अडगळ’ या भालचंद्र नेमाडे लिखित कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मूर्तिदेवी पुरस्कार

  • साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा मूर्तिदेवी पुरस्कार,
  • हा पुरस्कार दरवर्षी भारतीय भाषा आणि इंग्रजी साहित्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लेखकांना प्रदान करण्यात येतो
  • 2019 : डॉ. विश्वनाथ तिवारी
  • २०१९ ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. विश्वनाथ तिवारी यांच्या ‘अस्ति और भवति’ या आत्मचरित्राला जाहीर झाला. प्रा. सत्यव्रत शास्त्री यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ही घोषणा केली.
  • डॉ. तिवारी हे मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील भेडिहारी, देवरिया येथील आहेत.

नोबेल पुरस्कार : २०२०

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

  • वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराविषयी
  • सुरुवात : १९०१
  • ठिकाण : स्टॉकहोम, स्वीडन
  • सन २०१९ मधील पुरस्कारप्राप्त व्यक्ती : अमेरिकेचे विल्यम जे. केलीन, सर पीटर जे. रॅडक्लिफ, ग्रेक एल सेमेंझा.
  • सन २०२० चा हा पुरस्कार:
  • नोबेल पुरस्कार समितीने ५ ऑक्टोबर, २०२० रोजी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा केली. यावर्षीचा हा नोबेल पुरस्कार हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना जाहीर झाला.
  • त्यांचे कार्य : या तिघांनी मिळून केलेल्या ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • या वैज्ञानिकांच्या शोधामुळे मानवजातीसाठी वरदान ठरलेल्या ‘हिपॅटायटिस सी’ विषाणूंमुळे होणारे आजार बरे होऊ शकतात. या संशोधनामुळे यासंबंधीच्या आजारांसाठी संभाव्य रक्त चाचण्या करता येणे शक्य झाले.
  • ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूचे समूळ उच्चाटन होऊ शकते.

भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार

  • सुरुवात : १९०१
  • ठिकाण: स्टॉकहोम, स्वीडन
  • सर्वाधिक वेळा हा पुरस्कार मिळवणारी व्यक्ती : जॉन बार्डिन (१९५६ आणि १९७२).
  • सन २०१९ मधील पुरस्कारप्राप्त व्यक्ती : स्वित्झर्लंडचे मायकल मेथॉर, दिदियर क्लोझ, अमेरिकन कॅनडाचे जेम्स पेबल्स,
  • सन २०२० चा हा पुरस्कार: रॉजर पेनरोज, रेनहार्ड गॅजेल आणि एन्ड्रिया गेज यांना जाहीर झाला,
  • नोबेल पुरस्कार समितीने ६ ऑक्टोबर, २०२० रोजी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा केली.
  • त्यांचे कार्य : ‘ कृष्णविवर’ (ब्लॅक होल) निर्मितीला भौतिकशास्त्राच्या ‘जनरल थिअरी ऑफ रिलेटिविटी’ शी जोडण्याचं काम रॉजर पेनरोज यांनी केले. रेनहार्ड आणि एन्ड्रिया या दोघांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेले अतिविशाल ब्लॅक होल शोधून काढले. त्यांचे हे संशोधन अंतराळ संशोधनात अतिशय मोलाचे ठरले आहे.

रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार

  • सुरुवात: १९०१
  • ठिकाण: स्टॉकहोम, स्वीडन
  • सर्वाधिक वेळा हा पुरस्कार मिळवणारी व्यक्ती : फ्रेड्रिक सँगर (१९५८ आणि १९८०).
  • २०१९ मधील हा पुरस्कार प्राप्त व्यक्ती : अमेरिकेचे जॉन गुडइनफ, ब्रिटनचे एम. स्टॅनले व्हिटिंगहॅम, जपानचे अकिरा योशिनो.
  • सन २०२० चा हा पुरस्कार
  • स्वीडिश अॅकॅडमीने ७ ऑक्टोबर, २०२० रोजी नोबेल पुरस्कार जाहीर केला.
  • सन २०२० चा हा पुरस्कार फ्रान्सच्या इमॅन्युएल शापेंटी आणि अमेरिकेच्या जेनिफर ए. डाउडना या दोघांत विभागून देण्यात आला. यासह रसायनशास्त्रामध्ये एकाच विभागात दोन्हीही पुरस्कार दोन किंवा सर्वच महिलांनी मिळवण्याची ही पहिलीच घटना ठरली.

त्यांचे कार्य : जनुकीय संपादनासाठी वापरण्यात येणाऱ्या रेणवीय कात्र्यांच्या संशोधन कार्यासाठी त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.

साहित्याचा नोबेल पुरस्कार

  • सुरुवात : १९०१
  • ठिकाण : स्टॉकहोम, स्वीडन,
  • हा पुरस्कार मिळवणारे रुडयार्ड किपलिंग (वय ४१) हे सर्वात कमी वयाचे व्यक्ती आहेत.
  • हा पुरस्कार मिळवणारी भारतीय व्यक्ती भारतीय बंगाली साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांना सन १९१३ मध्ये ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला. ते हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आणि आशियाई व्यक्ती ठरले.
  • सन २००१ मध्ये व्ही. एस. नायपॉल यांना हा पुरस्कार मिळाला.

२०१९ मधील पुरस्कारप्राप्त व्यक्ती: ऑस्ट्रेलियाचे पीटर हँडकी.

  • स्वीडिश ॲकॅडमीने ८ ऑक्टोबर, २०२० रोजी अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर केला.
  • त्यामुळे २७ वर्षांनंतर पहिल्यांदा एखाद्या अमेरिकन कवीला पुरस्कार मिळाला आहे.
  • यापूर्वी सन १९९३ मध्ये अमेरिकन लेखिका टोनी मॉरिसन यांना हा पुरस्कार मिळाला होता.
  • सन १९९६ नंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या कवयित्री ठरल्या. सन १९९६ मध्ये पोलंडच्या कवयित्री विस्लावा सिम्बोस्क यांना हा पुरस्कार मिळाला होता.

अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार

  • सुरुवात : १९६९
  • ठिकाण : स्टॉकहोम, स्वीडन,
  • २०१९ मधील हा पुरस्कारप्राप्त व्यक्ती : अभिजित बॅनर्जी, एस्थर डफ्लो, मायकेल क्रेमर.
  • नोबेल समितीने १२ ऑक्टोबर, २०२० रोजी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा केली.
  • २०२० चा हा पुरस्कार पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना जाहीर झाला.

शांततेचा नोबेल पुरस्कार

  • सुरुवात : १९०१
  • ठिकाण : ओस्लो, नॉर्वे.
  • हा पुरस्कार मिळवणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती : मलाला युसुफझाई (वय-१७, पाकिस्तान)
  • हा पुरस्कार मिळवणारे सर्वांत वयस्कर व्यक्ती : जोसेफ रोटब्लास्ट (वय — ८७, इंग्लंड)
  • सर्वाधिक वेळा हा पुरस्कार मिळवणारी संस्थाः आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समिती (१९१७, १९४४, १९६३).
  • २०१९ ची पुरस्कारप्राप्त व्यक्ती : इथिओपियाचे पंतप्रधान अबीय महमद अली.
  • नॉर्वेच्या संसदेने व नियुक्त समितीने ९ ऑक्टोबर, २०२० रोजी शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा केली.
  • २०२० चा हा पुरस्कार संयुक्त राष्ट्राच्या ‘जागतिक अन्न कार्यक्रम’ (World Food Program WFP) या संघटनेला जाहीर झाला.
  • या संघटनेचे कार्य : जगभरामध्ये तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थिती असलेल्या प्रदेशांमध्ये अन्न पुरवठा आणि तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेले कार्य यामुळे या संघटनेला शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.
  • जागतिक अन्न कार्यक्रम

• स्थापना १९ डिसेंबर १९६१

• मुख्यालय : रोम (इटली) कार्यकारी संचालक : डेविड मुल्ड्रो ब्यासली

जागतिक शिक्षक पुरस्कार, 2020 : रणजितसिंह डिसले

  • रणजितसिंह डिसले यांना ३ डिसेंबर २०२० रोजी जागतिक शिक्षक पुरस्कार, २०२० जाहीर करण्यात आला.
  • ते महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील (परातेवाडी) प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत.
  • हा पुरस्कार मिळवणारे रणजितसिंग डिसले हे पहिले

जागतिक शिक्षक पुरस्काराविषयी

  • २०१५ पासून हा पुरस्कार वार्की फाउंडेशनतर्फे (Varkey Foundation) दिला जातो.
  • पुरस्काराअंतर्गत १ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे ७.५ कोटी रुपये) इतकी रक्कम दिली जाते.
  • • रणजितसिंह डिसले यांनी पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील इतर ९ शिक्षकांना देण्याचे जाहीर केले.
  • पुरस्काराच्या आतापर्यंतच्या ऐतिहासात प्रथमच एखाद्या शिक्षकाने पुरस्काराची रक्कम इतर ९ पुरस्कार विजेत्यांसह सामायिक केली आहे, असे वार्की फाउंडेशनने नमूद केले.
  • जागतिक शिक्षक पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षकांच्या समाजातील भूमिकेचा आणि शिक्षकी पेशात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो.
  • हा पुरस्कार संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार

  • Mool२००३ पासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
  • हा पुरस्कार जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांच्या नावाने दिला जातो.
  • धर्मनिरपेक्षता, तर्कवाद यांवर निर्भीडपणे आपले मत मांडणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
  • २०१९ पर्यंत हा पुरस्कार ‘एथिइस्ट अलाइन्स ऑफ अमेरिका तर्फे देण्यात येत होता, मात्र २०१९ पासून हा पुरस्कार ‘सेंटर एनक्वायरी’कडून दिला जातो.

२००३ चा प्रथम पुरस्कार कॅनडाच्या जेम्स रँडी यांना प्रदान करण्यात आला होता. तर २०१९ चा पुरस्कार इंग्लंडच्या रिकी गेरवाइस यांना देण्यात आला होता.

2020 : जावेद अख्तर

  • गीतकार जावेद अख्तर यांना ८ जून २०२० रोजी रिचर्ड डॉकिन्स पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते भारतातील पहिले व्यक्ती ठरले.

--

--